
डॉ. संतोष दास्ताने
देशाच्या रिझर्व्ह बँकेने २०२४-२५ या वर्षासाठी दोन लाख ६९ हजार कोटी रुपये इतक्या विक्रमी लाभांशाची रक्कम केंद्र सरकारला देत असल्याची घोषणा केली आहे. यातील बारकावे काय आहेत, तज्ज्ञांचे मत काय आहे, याचा आढावा.
वित्तीय ओढाताण आणि समस्या यांचा सतत अनुभव घेणाऱ्या केंद्र सरकारला गेल्या आठवड्यातील एका बातमीने काहीसा दिलासा मिळाला आहे. देशाच्या रिझर्व्ह बँकेने २०२४-२५ या वर्षासाठी दोन लाख ६९ हजार कोटी रु. इतका विक्रमी लाभांश केंद्र सरकारला देत असल्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम दोन लाख ११ हजार कोटी इतकी होती. अर्थसंकल्पात अंदाजिलेल्या रकमेपेक्षाही ही रक्कम सुमारे रु. ५० हजार कोटी रुपयांनी जास्त आहे.