Premium|Benefits of Reading Books for Children : लहानपणी वाचून दाखवलं तरच किशोरवयात मुलं स्वतःहून वाचतील; वाचनाची आवड कशी जोपासावी?

Why Children Dislike Reading : लहानपणी पुस्तकांशी गट्टी न जमल्याने आणि डिजिटल स्क्रीनच्या SCREAM (Screen Caused Reading Minimization) व्यसनामुळे मुलांची वाचनाची आवड कशी लोप पावत आहे, आणि पुस्तकवाचनाचे मेंदूच्या जडणघडणीतील महत्त्व सांगणारा हा सविस्तर लेख.
Benefits of Reading Books for Children

Benefits of Reading Books for Children

esakal

Updated on

लहानपणी मुलांना वाचून दाखवलं तर ती किशोरवयात स्वतःहून वाचू लागण्याची शक्यता जास्त असते. जी मुलं जास्त वाचतात, ती अधिक शब्द शिकतात... अधिक शब्दांमुळे वाचन सोपं आणि अधिक आनंददायक होतं. अशा आनंदामुळे वाचनाची आवड वाढते.

जर तुम्ही स्वतःची ओळख वाचक म्हणून देत नसाल, तर त्यामागे खालील कारणं असू शकतात...

ज्या घरात पुस्तकं नाहीत, अशा घरात तुम्ही लहानाचे मोठे झालात. यामागे अनेक आर्थिक किंवा सामाजिक कारणं असू शकतात.

तुमचे आई-वडील, आजी-आजोबा किंवा कुणीही कुटुंबातील सदस्य तुमच्यासमोर वाचत नव्हते. आवडते लेखक, पुस्तकं यावर घरात चर्चा होत नव्हती.

कुणीतरी तुम्हाला म्हटलं, ‘तुला वाचायला फारसं आवडत नाही.’ तुम्ही ते मान्य केलं आणि स्वतःही म्हणू लागलात, ‘मला वाचायला फारसं आवडत नाही.’ हळूहळू ही तुमची ओळख बनली. तुम्हाला विशिष्ट पुस्तकं जबरदस्तीने वाचायला दिली गेली. तुम्हाला स्वतः पुस्तकं निवडण्याची मोकळीक नव्हती. त्यामुळे सुरुवातीची काही पुस्तकं कंटाळवाणी वाटली आणि तुम्ही वाचन सोडून दिलं. लहानपणीच तुमच्या हातात स्क्रीन आला. तुम्हाला यांपैकी कुठलं कारण जवळचं वाटतं? हे लक्षात ठेवा, की वरील कारणांमुळेच तुमची मुलंदेखील स्वतःला पुस्तक न वाचणारी म्हणून ओळखतात!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com