Premium|Reading for Mental Strength in Sports : अनेक यशस्वी खेळाडू पुस्तके वाचतात

Athlete Mental Health Coaching : महान खेळाडूंच्या मानसिक सक्षमीकरणासाठी 'वाचन' हे एक प्रभावी औषध असून, पुस्तकांमुळे खेळाडूंचा संयम, एकाग्रता आणि कामगिरीत ३० टक्क्यांपर्यंत सुधारणा होऊ शकते.
Reading for Mental Strength in Sports

Reading for Mental Strength in Sports

esakal

Updated on

रिता गुप्ता - info@reetaramamurthygupta.in

महान टेनिसपटू नोवाक जोकोविचला एकहार्ट टोले लिखित ‘द पॉवर ऑफ नाऊ’ या पुस्तकाने प्रेरणा दिली होती. खरे तर, समान कौशल्ये असलेले शंभर खेळाडू एकाच पारितोषिकासाठी स्पर्धा करत असतील, तर त्या स्पर्धेत मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम असलेला खेळाडूच मैदानावर शांतता, संयम आणि अचूकता राखत कामगिरी करू शकतो. काही तरुण खेळाडूंमध्ये घडलेला हा बदल वाचन प्रशिक्षक म्हणून मी स्वतः जवळून पाहिला आहे.

एका तरुण खेळाडूसोबत वर्षभर नियमित वाचन सत्रे घेतली. आठवड्यातून तीन ते चार वेळा, साधारण पंचेचाळीस मिनिटांचे हे मानसिक उपचार वर्ग असत. प्रत्येक सत्राचे एक स्पष्ट उद्दिष्ट होते, उदा. निर्णायक क्षणी शांत राहता न येणे. दिलासादायक बाब म्हणजे, कोणतेही आव्हान असो, त्यावर मार्गदर्शन करणारी काही पाने तरी एखाद्या पुस्तकात नक्कीच सापडतात. अशा वेळी रायन हॉलिडे यांचे ‘द ऑब्स्टॅकल इज द वे’ या पुस्तकात खूप शक्तिशाली धडे आहेत. मी पुस्तकांची निवडही बदलत ठेवली. मी सहानुभूती विकसित करण्यासाठी काल्पनिक पुस्तके वापरली आणि आत्मचरित्रांचादेखील वापर केला. जसे आंद्रे आगासी यांची ‘ओपन’. अल्फ्रेड लॅन्सिंग्ज एंड्युअरन्स हे सहनशक्ती विकसित करण्यासाठी आणखी एक चांगले पुस्तक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com