
शंतनु दीक्षित, अश्विन गंभीर
सौरऊर्जा क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी सरकारने अनेक सवलती दिल्या होत्या. आता त्यात कपात होत आहे. मात्र हे अपरिहार्य असे वळण आहे. आता सौरऊर्जानिर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आता या क्षेत्राला आत्मनिर्भर व्हावेच लागेल, सवलती संपतीलच, अशी मानसिक तयारी आता करावीच लागेल.
वी ज नियामक आयोगाने ग्राहकांच्या सौरऊर्जा प्रकल्पांना देणाऱ्या काही महत्त्वाच्या सवलतीं नुकत्याच कमी केल्या आहेत. अशा सवलती देण्यामागची कारणे व आता या सवलतींचा पुनर्विचार करणे अपरिहार्य का आहे याचा आढावा घेऊया.