

Relationship communication tips
esakal
आजच्या वेगवान आणि धावपळीच्या जीवनात नात्यांमध्ये वाद होणे खूप सामान्य झाले आहे. अनेकदा हे वाद अचानक सुरू झाल्यासारखे वाटतात. पण प्रत्यक्षात त्यामागचं मुख्य कारण मतभेद नसून संवादाचा अभाव असतो. आपल्याला काय वाटतं, काय अपेक्षित आहे, किंवा नेमकी अडचण काय आहे. हे स्पष्टपणे न सांगितल्यामुळे लहान गोष्टी मोठ्या तणावात बदलतात. बोलताना चुकीचे शब्द वापरले जातात, ऐकताना लक्ष नसतं, आणि हळूहळू गैरसमज वाढू लागतात.
अशी परिस्थिती फक्त नवरा-बायकोमध्येच नाही तर मित्र, कुटुंबीय, सहकारी किंवा ऑफिसमधील नात्यांमध्येही दिसून येते. यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, मनात नाराजी वाढते, आणि संवाद नकोसा वाटू लागतो. अनेकदा आपण म्हणतो, “तो/ती मला समजून घेत नाही,” पण प्रत्यक्षात आपणही आपलं म्हणणं नीट मांडलेलं नसतं.
तुम्ही कधी छोट्या गोष्टींच्या संवादातून अचानक मोठ्या तणावात पोहोचला आहात का? अशा वेळी काय बोलावं, कुठे थांबावं, कसं ऐकावं ह्या विचारात पडला आहात का ? संवाद कुठे आणि कसा चुकतो, आणि तो सुधारण्यासाठी काय करता येईल. हे सगळं आपण सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया सकाळ + च्या या विशेष लेखातून.