Premium| Research ethics: संशोधन क्षेत्रातील नैतिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Academic misconduct: संशोधनातील अप्रामाणिकपणा ही केवळ वैयक्तिक चूक नाही. तो देशाच्या विश्वासार्हतेवर परिणाम करणारा गंभीर प्रश्न आहे
Research ethics

Research ethics

esakal

Updated on

डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू

संशोधनात नैतिकता जोपासली जावी यासाठी काही नियम तयार करण्यात आले आणि त्यांची अंमलबजावणी जगभर होऊ लागली. असे असूनही या क्षेत्रातील अप्रामाणिकपणा पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. या प्रश्‍नाची दखल घेऊन संशोधनाचे पोकळ दावे करण्यास यापुढे कुणी धजावणार नाही, अशी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधनासंदर्भातील चुकीच्या श्रेयवादामुळे नुकतीच मोठी खळबळ उडाली. नवी दिल्लीत भरविण्यात आलेल्या ‘एआय इम्पॅक्ट समिट’ नामक आंतरराष्ट्रीय संमेलनात घडलेल्या या घटनेमुळे संशोधनातील नैतिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तशी ही समस्या जुनीच आहे. अगदी सुरवातीच्या काळात संशोधन हे स्वयंस्फूर्तीने केले जाई; त्याला व्यापारी अथवा सैनिकी महत्त्व नव्हते; म्हणजेच आर्थिक प्रेरणेने किंवा देशाच्या युद्धाबाबतच्या गरजांमधून ते होत नव्हते.उदाहरणार्थ, केप्लरने ग्रहांवर आधारित नकाशे तयार केले. पुढे या नकाशांचा उपयोग समुद्रपर्यटनासाठी होऊ लागल्यानंतर संशोधनाला महत्त्व प्राप्त झाले. यातूनच संशोधनसंस्थांची निर्मिती, संशोधनाचा तंत्रज्ञानाच्या विकासासाठी उपयोग, आर्थिक लाभ, मानसन्मान आणि श्रेय अशा गोष्टींचे प्रस्थ वाढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com