

tourism ethics
esakal
विठ्ठल काळे
प्रवासाचा किंवा पर्यटनाचा आनंद मिळवत असताना आपल्यावर काही जबाबदाऱ्या आहेत, याचा आपल्याला विसर पडला आहे का? पर्यटन येत्या काळात खूप मोठा ‘व्यवसाय’ होऊ पाहतो आहे. जर व्यवसाय म्हणून त्याची वाढ होणं अपेक्षित आहे; तर त्याचे नियमही पाळले पाहिजेत... विडनंतर लोक मोठ्या संख्येने बाहेर फिरायला जाऊ लागले आहेत’ हे वाक्य आपण बऱ्याच वेळा ऐकतो. हे वाक्य खरं आहे की खोटं, हा संशोधनाचा विषय आहे. संशोधन यासाठी की जर, हे खरं असेल तर ‘का’ हा मोठा प्रश्न उभा राहतो. कोविडनंतर लोकांच्या विचारांमध्ये काय फरक पडला? ‘खर्चिक’ असूनही लोक का फिरायला जात आहेत? कोविडमध्ये आयुष्याचा क्षणभंगुरपणा अधोरेखित झाला आहे का? ‘जे आहे ते आताच आहे... आयुष्य मनमुराद जगून घ्या, आनंद घ्या, स्वतःसाठी जगा’ असे नवीन अलिखित सामाजिक नियम तयार झाले आहेत का? या नवीन नियमांचा आधार घेत माणूस यातून आनंद मिळवू पाहत आहे. स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबानेही फिरावं, वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं पाहावीत, निसर्ग, मानवनिर्मित अद्भुत कलाकृती पाहाव्यात, त्याचा आनंद घ्यावा, अशी इच्छा प्रबळ होत आहे; परंतु हा आनंद मिळवत असताना आपल्यावर काही जबाबदाऱ्या आहेत, याचा आपल्याला विसर पडला आहे का?