
आरती फुले-बनसोडे
bbansodeaarti@gmail.com
हिंसाचार आणि आक्रमकता ही आधुनिक समाजाला सामोरे जाताना सर्वात महत्त्वाची चिंताजनक बाब बनली आहे. सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून जीवनशैलीतील बदल आणि मुलांच्या संगोपन करण्याच्या पद्धतीमधील आधुनिकता यामुळेच आक्रमकता अन् हिंसाचार आज सर्वत्र वेग धरत आहे.
दहावीतील एका मुलाने पेपर काॅपी करू दिला नाही म्हणून रागाच्या भरात गोळ्या झाडून एका विद्यार्थ्याला जीवे मारले. आपल्या युवकांना नक्की झालेय तरी काय, अशी चिंता वाढवणारी ही घटना नुकतीच घडली.