
संजय कुमार
लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीला सातत्याने पराभवांचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या निवडणुकीतही आम आदमी पक्षाची सत्ता निसटली आहे. यामध्ये आघाडीतील मित्रपक्ष परस्परांवर आरोप करत आहेत. या वर्षभरात होणाऱ्या निवडणुकांतील समीकरणांमुळे हा ताण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांमध्ये अत्यानंदाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, ही स्थिती वेगाने अदृश्य होत असून, त्यानंतरच्या निवडणुकांतील पराभवांमुळे या आघाडीतील मित्रपक्ष परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे, या आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.