DOGE Elon Musk exitesakal
प्रीमियम आर्टिकल
Premium| Musk DOGE Exit: ‘डोजनाट्या’तून मस्क यांची एक्झिट ...
Private Sector in Public Policy: अमेरिकेतील ‘डोज’ प्रयोग ठरला अयशस्वी. यातून भारताने सरकारी यंत्रणेत खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहभागाबद्दल शिकण्यासारखे काय?
हर्ष काबरा
saptrang@esakal.com
उद्योगपती इलॉन मस्क यांची ‘डोज’मधून एक्झिट ही खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांना सरकारी धोरणनिर्मितीत उतरवताना कोणती धोक्याची पातळी ओलांडू नये, याचा अचूक धडा आहे. अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे केले आणि त्यातून पुढे जे काही घडले, ते भारतासाठीही विचार करायला लावणारे आहे.
इलॉन मस्क अखेरीस ट्रम्प प्रशासनाला अलविदा म्हणाला. शासन कार्यक्षमता विभाग अर्थात डोजरूपी वाघिणीच्या शेपटावरून आपली हातझाडणी केली. एका वादग्रस्त नाटकाचा शेवटचा पडदा पडला. पण हे नाटक केवळ अमेरिकेपुरते मर्यादित नाही. सरकारी यंत्रणेत खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांचा प्रभावी सहभाग कसा घ्यावा, याबद्दल भारतासाठीही यात महत्त्वाचे धडे आहेत.