

Rohida Fort History
esakal
डॉ. श्रीमंत कोकाटे - shrimantkokate1
@gmail.com
बिनीचा म्हणजे उत्कृष्ट किंवा आघाडीचा म्हणून रोहिडा किल्ल्याची शिवकाळात ख्याती होती. रोहिडा गडाला मोठा प्राचीन इतिहास आहे. राष्ट्रकूट, यादव, आदिलशाही आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी रोहिडा किल्ल्यावरून राज्यकारभार केला. हा गड आदिलशहाच्या ताब्यात असताना असदखान हा त्याचा हवालदार होता. तो गड जिंकून घेण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. या अल्पायुष्यात त्यांनी विश्वविख्यात असे लोककल्याणकारी राज्य केले. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात भोर तालुक्यातून झाली. त्यांनी स्वराज्याची शपथ रायरेश्वरावर घेतली. हे रायरेश्वर स्थान भोर तालुक्यात आहे. त्यांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा हा तत्कालीन भोर तालुक्यात म्हणजे आताच्या राजगड तालुक्यात आहे. त्यांची सुमारे पंचवीस वर्षे राजधानी याच तालुक्यात होती. रोहिडा हा किल्लादेखील भोर तालुक्यातच आहे. असा हा शिवछत्रपतींच्या वास्तव्याने आणि कर्तृत्वाने पुनित झालेला तालुका आहे. या तालुक्यात अनेक किल्ले आणि महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे आहेत.