
शैलेश नागवेकर
shailesh.nagvekar@esakal.com
आजमितीला क्रिकेटविश्वात सर्वात प्रभावशाली कर्णधार आहे रोहित शर्मा. त्याची दखल सर्वत्र घेतली जाते. तिन्ही प्रकारांत मिळून तो सध्या सलग १५ नाणेफेक हरला आहे, पण सामने जिंकत आहे. असेच असतात खरेखुरे बाजीगर. परिस्थिती कितीही आणि कशीही प्रतिकूल असली तरी त्यातून मार्ग काढणाराच सिकंदर म्हणून ओळखला जातो, तोच असतो बाजीगर!