सुनंदन लेले
sdlele3@gmail.com
दिवशी अगदी पहाटे भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानातील नऊ अतिरेकी स्थळांवर कडाडून हल्ला चढवला त्याच दिवशी म्हणजे ७ मे रोजी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. तसे बघायला गेले तर दोनही गोष्टी अनपेक्षित नव्हत्या. चारही बाजूंचा विचार करून आक्रमण आणि बचावात संपूर्णपणे सज्ज होऊन मगच पाकिस्तानवर हवाई हल्ला करायचा निर्णय घेतला गेला, ज्याला पूर्णत्वाकडे नेले भारतीय सैन्य दलाने. संपूर्ण भारत या कृतीबद्दल समाधान व्यक्त करत असताना संध्याकाळी रोहित शर्माने कसोटी क्रिकेट सोडल्याची बातमी येऊन धडकली. प्रथमदर्शनी तरी मला रोहित शर्माने घेतलेला निर्णय समंजस वाटला.