

Bihar women voters support Nitish Kumar
esakal
कल्याणी शंकर
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. बिहारमधील महिलांची या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्या एक प्रभावशाली मतदारांचा गट म्हणून उदयास आल्या आहेत. महिला मतदारांचे प्राधान्य कोणाला आहे, त्यांची भूमिका काय आहे या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सत्तेत येऊ इच्छिणाऱ्या पक्षाला महिला मतदारांच्या टक्केवारीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
बिहारमध्ये निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. या निवडणुकीत कोणते मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करणार, यावर निवडणुकीची गणिते अवलंबून असणार आहेत. मतांची ही गोळाबेरीज सत्तेत येणाऱ्या सरकारसाठी महत्त्वाची ठरणार आहे. बिहारमधील महिलांची या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्या एक प्रभावशाली मतदार गट म्हणून उदयास आल्या आहेत.