Premium| RTI Application : माहितीचा अधिकार नेमका कसा वापरायचा? अर्ज करण्यापासून अपील करण्यापर्यंत जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

RTI Act : माहितीचा अधिकार कायदा (RTI Act) म्हणजे काय? ऑनलाइन आरटीआय अर्ज कसा करायचा, किती शुल्क लागते, माहिती किती दिवसांत मिळते आणि अपील कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
RTI Application

RTI Application

esakal

Updated on: 

सरकारी कार्यालयात एखादे काम रखडले आहे, एखाद्या योजनेचा निधी नेमका कुठे खर्च झाला हे जाणून घ्यायचे आहे किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करायचे आहेत... तर तुम्ही काय करू शकता? अनेकांना असं वाटतं की, या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याशिवाय पर्याय नाही. पण तुम्हाला माहित आहे का, नागरिकांच्या हातात एक असे कायदेशीर शस्त्र आहे, ज्याच्या मदतीने ते थेट सरकारला प्रश्न विचारू शकतात. हे शस्त्र म्हणजे माहितीचा अधिकार अर्थात आरटीआय! या कायद्यामुळे सरकारी कागदपत्रांची पाहणी करण्यापासून ते भ्रष्टाचाराचे पुरावे उघड करण्यापर्यंत अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण आरटीआय अर्ज नेमका कसा करायचा? कोणती माहिती मागता येते? आणि माहिती देण्यास नकार मिळाल्यास पुढे काय करता येते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया सकाळ+च्या या विशेष लेखातून.

Loading content, please wait...