
जळगावची रेल्वे दुर्घटना केवळ अपघात नाही, तर आपल्या मानसिकतेचा, आपल्या व्यवस्थेचा आणि आपल्या तंत्रज्ञानाच्या वापराचा आरसा आहे. एखाद्या अफवेमुळे घडलेली लहानशी चूक अनेक जीव घेऊन जाते. अफवांचे योग्य व्यवस्थापन आणि त्या चुकलेल्या माहितीचा सामना करण्याची पद्धत अधिक सुस्पष्ट अन् संघटित करणे अत्यंत आवश्यक आहे.
ॲड. शशिकांत चौधरी
Law4justice.sc@gmail.com
२२ जानेवारी २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यातील महेगी रेल्वे स्थानकाजवळ एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला, ज्यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि १५ जण जखमी झाले. अपघाताचे मूळ कारण होते अफवा.
गाडीला आग लागल्याची अफवा पसरवली गेल्याने अनेक प्रवासी गोंधळले आणि जेव्हा इतर कोणालाही तातडीच्या संपर्कासाठी दूरध्वनी केला गेला नाही, तेव्हा त्याचे अत्यंत गंभीर परिणाम झाले. संबंधित दुर्घटनेमुळे एक मोठा मुद्दा उभा राहिला आहे, की डिजिटल भारताच्या युगात, तंत्रज्ञानाची सर्वसमावेशकता असतानाही अफवांचा कसा प्रसार होऊ शकतो आणि त्याच्या परिणामस्वरूप दुर्दैवी अपघात घडू शकतात...