Premium|Rural Entrepreneurship : गावाकडे राहणं म्हणजे गरिबी नव्हे; मेहनतीतून स्वतःचं आर्थिक विश्व उभारण्याचा नवा मार्ग

Rural Entrepreneurship and Financial Independence : शहरातून गावाकडे परतणं म्हणजे गरिबी स्वीकारणं नव्हे; गावातील संधी ओळखून, योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचं आर्थिक विश्व उभारता येऊ शकतं.
Rural Entrepreneurship and Financial Independence

Rural Entrepreneurship and Financial Independence

esakal

Updated on: 

गावात येणं म्हणजे गरिबी स्वीकारणं नाही. गावात आल्यावर आर्थिक संकट आपोआप दूर होईल, असंही नाही; पण तिथल्या संधी ओळखून आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचं काम उभं करता येऊ शकतं. गावी जाणं हा निर्णय असू शकतो; पण तिथे स्वतःचं आर्थिक विश्व उभं करण्यासाठी तयारी लागते. त्यासाठीचं आकलन महत्त्वाचं आहे.

गाव म्हणजे फॅसिनेटिंग गोष्ट वाटते अनेकांना. गावाबद्दल आकर्षण वाटतं. गावी जाऊन दोन दिवस राहण्यापुरतं काहीही अडचण नाही; पण कायमचं राहण्याबद्दल शंका वाटते.

दोन दिवस गावी राहा, मजा करा, निवांत झोपा, स्वतःच्या वेळेचे मालक व्हा आणि पुन्हा नांगराला जुंपतात तसे शहरात जाऊन जुंपले जा, अशीही एक गोष्ट लोकांनी फार आनंदाने स्वीकारलेली आहे. त्याचे भलेबुरे सर्व परिणामही लोकांनी स्वीकारलेले आहेतच; पण शहरात जुंपण्यापेक्षा गावातच स्वतःला गुंतवून घेता येतं. मात्र, असं करणारे क्वचित सापडतात आणि त्यामुळेच ते वेगळे ठरतात.

गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला, की सगळ्यात आधी एक प्रश्न विचारला जातो - गावी जाऊन करणार काय? हा प्रश्न रास्त आहे. पण, अनेकदा तो प्रश्न म्हणून विचारला जात नाही; तर गावात राहून काहीतरी करता येईल, या शक्यतेलाच नाकारण्यासाठी विचारला जातो. गावी जाणं म्हणजे गरिबी स्वीकारणं, स्वतःच्या गरजा कमी करणं किंवा शहरात जमलं नाही म्हणून गावाकडे परतणं, असाही एक समज आहे. तो बदलायला हवा.

Loading content, please wait...