पुणे : गेल्या काही दिवसांपासून रशिया भारताकडून १० लाख कुशल कामगार आयात करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रशियातील 'उरल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'चे प्रमुख आंद्रे बेसेदिन यांच्या वक्तव्याने ही बातमी चर्चेत आली. त्यांनी रशियाच्या स्वेयार्दलोव्हस्क प्रदेशातील औद्योगिक क्षेत्रांना कामगारांची तीव्र गरज असल्याचे सांगितले होते. मात्र रशिया खरोखरच कामगारांना नोकरी देणार की हा जर्मनीप्रमाणे हे देखील कामाचे गाजर ठरणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
रशियाच्या बाबतीत एकीकडे आंद्रे बेसेदिन यांचे एक म्हणणे आहे तर दुसरीकडे मात्र, रशियन कामगार मंत्रालयाने या घोषणेला थेट आव्हान दिले. ज्यामुळे या दाव्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे देश खरोखरच कामगार आयात करणार आहेत का..? की हे भारताला दाखवण्यात आलेले गाजर आहे..? भारतातील कामगारांना या देशात कोणत्या संधी उपलब्ध आहेत..? जर्मनीचा प्रकल्प का रखडला..? हे सगळंच जाणून घेऊया सकाळ प्लसच्या या लेखातून..