Premium|Saadat Hasan Manto : अश्लीलतेचे आरोप झेलणारा लेखक; ‘एक हां’ नाटकातून मंटोंच्या आयुष्याचा रंगमंचावर वेध

Saadat Hasan Manto and Ek Haan : समाजाचा दुटप्पीपणा आपल्या कथांमधून उघड करणारे लेखक सआदत हसन मंटो यांच्या वादळी आयुष्याचा आणि साहित्यिक बंडखोरीचा वेध घेणारे ‘एक हां’ हे उर्दू नाटक त्यांना नव्याने समजून घेण्याची संधी देते.
Saadat Hasan Manto

Saadat Hasan Manto

esakal

Updated on: 

लेखनाच्या माध्यमातून समाजाचा दुटप्पीपणा उघड करणारे, अश्लीलतेचे आरोप झेलूनही आपल्या साहित्यिक निष्ठांशी तडजोड न करणारे सआदत हसन मंटो आजही अस्वस्थ करतात. त्यांच्या आयुष्याचा आणि लेखनाचा वेध घेणारं ‘एक हां’ हे उर्दू नाटक त्यांना नव्याने समजून घेण्याची संधी देतं. आपल्याला रंगमंचावर पुन्हा एकदा एका बंडखोर लेखकाला भेटता येतं!

काही लेखकांचं आयुष्य एवढं वादळी आणि खळबळजनक घटनांनी भरलेलं असतं, की त्यावर नाटकं अन् सिनेमे सहज बनतात, बनू शकतात... असेच एक लेखक म्हणजे सआदत हसन मंटो (१९१२-१९५५). त्यांच्या जीवनावर नंदिता दास यांनी २०१८ मध्ये ‘मंटो’ हा सिनेमा बनवला. एका अर्थाने मंटो भाग्यवानच म्हणायला हवेत. कारण त्याच्याआधी म्हणजे २०१५ मध्ये, पाकिस्तानातही त्यांच्यावर आधारित ‘मंटो’ याच नावाचा चित्रपट बनला होता. ज्या दोन देशांमध्ये जन्मापासूनच वैर आहे, तिथे एकाच लेखकावर जवळपास एकाच काळात चित्रपट बनले, हे कदाचित एकमेव उदाहरण असावं. आता मंटो यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आधारित ‘एक हां’ हे उर्दू नाटक अलीकडेच मुंबईत मंचित झालं आहे.

Loading content, please wait...