Premium|Sadashiv Amrapurkar : काय केलंत तुम्ही नगरसाठी?

Sadashiv Amrapurkar and Ahmednagar Theatre : नगरच्या नाट्यचळवळीतील सदाशिव अमरापूरकरांचे योगदान, ‘कन्यादान’ नाटकाच्या उभारणीत सहभागी कलाकारांचे योगदान, दुर्लक्षित राहिलेली नावे आणि ‘भिडू’ चित्रपटाच्या निमित्ताने मिळालेला सन्मान.
Sadashiv Amrapurkar

Sadashiv Amrapurkar

esakal

Updated on: 

डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com

काही प्रश्‍न अनुत्तरित असलेलंच योग्य असतं. त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्यावर खूप वेगळेपणा जाणवतो. तुमच्या शहरासाठी काय केलं? हा प्रश्‍न खरोखरच वेदनादायी असतो. कारण आपली नाळ त्या शहराशी जोडलेली असते.

पुसटसं आठवतंय. नगरला नाट्यसंमेलनाची बैठक सुरू होती. त्यात सदाशिव अमरापूरकरांना कुणीतरी विचारलं होतं, ‘काय केलंत तुम्ही नगरसाठी?’

खरंतर एका वेगळ्या चर्चेचा विषय आहे हा आहे. ज्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने मुंबईत नाट्य परिषदेमध्ये सत्तांतर झालं. मधुकर तोरडमल यांनी मच्छिंद्र कांबळी आणि मंडळींची ‘भोजनभाऊ’ अशी भलावण केली होती... हे ते संमेलन.

मग मुंबईत काम करणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न भेडसावू लागला. आज अमरापूरकरांना विचारलं उद्या आपल्याला विचारलं तर!

काहींनी आपण काय ठेका घेतला काय?

बंड्यांनं (अमरापूरकरांविषयी जवळीक दाखवण्यासाठी लोक ‘बंड्या’ हे बिरूद वापरतात) काही नाही केलं, आपण कोण?

नगरसकट आख्ख्या मुंबईला हा प्रश्न पडला होता, की अमरापूरकरनं आयएनटी (INT) कशी ताब्यात घेतली, झवेरींना या अमरापूरकरने काय सांगून पटवलं? असा प्रश्न मलाही काही लोकांनी विचारला. यातलं उजवं-डावं करता येईल; परंतु हे निश्चित सोपं काम नव्हतं. नगरहून मुंबईला जायचं झवेरींच्या गोटात शिरून ‘कन्यादान’ बसवायचं... बोल लावणारे खूप असावेत.

परंतु नंतरच्या इतिहास लेखकांनी यांचं नाव वगळलं इतकंच काय अनिल क्षीरसागर (बालीकाका) यांनाही श्रेय द्यायला काहींचा आकस होता; आहे.

अलीकडच्या दोन-तीन लेखात बाली काकांचं नाव नसतं. संजय आढावचं, अयूब खानचं, मिलिंद रसाळचं नाव नसतं. सगळ्यांचे महर्षी रघुनाथ रावजी क्षीरसागर यांचा उल्लेख तर टाळतायत...

याचा हात धरू मग आपल्याला पुढे जाता येईल या उक्तीला जागून.

‘तुम्ही माझ्यासाठी देव आहात’ असं म्हणणारा एक वर्ग आहे नगरमध्ये.

‘भिडू’ असा सिनेमा करण्याचे प्रयोजन झाले. सगळे नगरमधले. (सहनिर्माते श्रीपाद दगडे आणि अमोल जेवरे)

सिनेमा तांत्रिक कसोटीवर काही टिकला नाही. या सिनेमासाठी छाया कदम हिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री, मला सर्वोत्कृष्ट अभिनेता असा दादासाहेब फाळके (दिल्ली) असा गौरव झाला. याच सिनेमाच्या पटकथेसाठी मला जयपूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथात निकालही उंचावता आला.

Loading content, please wait...