Premium|Fort of Faith and Valor : सज्जनगड; हिंदवी स्वराज्याच्या संघर्षाचा आणि श्रद्धेचा अभेद्य साक्षीदार

Sajjangad and Chhatrapati Shivaji Maharaj : सज्जनगड हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून हिंदवी स्वराज्याच्या संघर्षाचा, समर्थ रामदासांच्या आध्यात्मिक परंपरेचा आणि औरंगजेबाविरुद्ध मराठ्यांच्या अदम्य प्रतिकाराचा जिवंत साक्षीदार आहे.
Fort of Faith and Valor

Fort of Faith and Valor

esakal

Updated on

डॉ. श्रीमंत कोकाटे - shrimantkokate1@gmail.com

सह्याद्री पर्वतरांगेतील गडदुर्गांनी औरंगजेबाला सुमारे २६ वर्षे जेरीस आणले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हतबल झालेल्या हिंदूंना मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज आणि सिद्दीविरुद्ध लढून जिंकण्याची अभंग प्रेरणा दिली. त्यांनी निर्जीव गडदुर्गांनादेखील मोगल-आदिलशहाविरुद्ध लढायला शिकवले. गडदुर्गांनी हातात हात घालून हिंदवी स्वराज्याचे संवर्धन केले. त्या गडदुर्गांपैकी महत्त्वाचा दुर्ग आहे, परळीगड ऊर्फ सज्जनगड!

सज्जनगड अनेक नावांनी ओळखला जातो. सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव आहे. त्यामुळे त्याला ‘परळीगड’ असेही म्हटले जाते. या गडावर आश्‍वलायन ऋषींचे वास्तव होते, त्यामुळे त्याला ‘आश्‍वलायनगड’ असे म्हटले जाते, अशी एक आख्यायिका आहे. आदिलशहा आणि मोगलांनी या गडाचे नाव बदलून त्याला ‘नवरसतारा’ असे नाव दिले होते. असा या गडाच्या नावांचा इतिहास आहे. या गडाचे बांधकाम शिलाहार राजा भोज याने अकराव्या शतकात केले. बहमनी सत्तेच्या विघटनानंतर हा गड आदिलशहाकडे आला. त्याने या गडावर अनेक वर्षे राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, मोगलशाही नेस्तनाबूत करून लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्यांच्या ताब्यात असणारे गडदुर्ग जिंकून घेण्याची मोहीम हाती घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी २ एप्रिल १६७३ रोजी आदिलशहाच्या ताब्यात असलेला सज्जनगड जिंकून घेतला. त्याची डागडुजी केली. गडावर अनेक इमारती, मंदिरे बांधली. भक्कम बुरूज, मजबूत तटबंदी आणि अभेद्य महाद्वार बांधून गड अधिकच बलवान केला. हा गड वासोटा आणि अजिंक्यताऱ्याचा समन्वयक होता. अजिंक्यताऱ्याचा मदतनीस म्हणून सज्जनगडाची भूमिका महत्त्वपूर्ण होती. छत्रपती संभाजी महाराजांनी सज्जनगडावर येऊन स्वराज्याची उत्तम बांधणी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाला वाटले, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आपण सहज जिंकून घेऊ; परंतु मराठ्यांनी छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मोगलांविरुद्ध निकराची झुंज दिली. त्यांनी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. एप्रिल १६७० मध्ये औरंगजेबाने अजिंक्यतारा ताब्यात घेतल्यानंतर लगेच परळीगडाला म्हणजेच सज्जनगडाला वेढा टाकला. शहाजादा आज्जम, नसीरुल्लाखान, फत्तेहुल्लाखान यांनी सज्जनगडाला चोहोबाजूंनी घेरले. औरंगजेब स्वतः सज्जनगडाच्या पायथ्याला छावणीमध्ये राहू लागला. अशा कठीण प्रसंगी बहिरजी सोनाळे हा मराठा सरदार परळीचा परिसर सोडून मुलूखगिरीला निघून गेला. हे ज्या वेळेस महाराणी ताराराणी यांना समजले तेव्हा त्यांनी संतापाने त्याला लिहिले, की ‘औरंगजेब गनिम घरात आला आहे. त्यास मारून काढावे ते गोष्ट न करिता आपण मुलूखगिरी करावयास लागले तरी फौजेनिसी परताने.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com