Premium|Sant Kabir Philosophy : संत कबीरांच्या चादरीच्या भजनाचा गूढ अर्थ काय? ताणा-बाण्यातून उलगडते मानवी शरीराचे तत्त्वज्ञान

Sant Kabir Philosophy and Weaving : संत कबीरांच्या प्रसिद्ध चादरीच्या भजनातून मानवी शरीराचे गूढ, विणकामाचे तत्त्वज्ञान आणि भारतीय हातमाग परंपरेचा वारसा उलगडतो. ताणा-बाण्याच्या रूपकातून कबीर जीवनाचा अर्थ समजावतात.
Sant Kabir Philosophy and Weaving

Sant Kabir Philosophy and Weaving

esakal

Updated on: 

शेफाली वैद्य - saptrang@esakal.com

गेली अनेक दशके भारत सरकार हातमाग विणकरांना जो सर्वोच्च सन्मान प्रदान करते, तो याच संत कबीरांच्या नावाने ओळखला जातो. हे नामकरण मला फार बोलके आणि सार्थ वाटते. स्वातंत्र्यानंतर भारतीय हातमाग वस्त्रोद्योगाची चादर जपण्याची जबाबदारी एका नव्या राष्ट्राच्या खांद्यावर आली होती. ब्रिटिशांनी भारतीय वस्त्रोद्योग संपवायचे अनेक पद्धतीशीर प्रयत्न केले, तरीही भारतीय हातमाग उद्योग पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात ब्रिटिशांना अपयश आले. इतिहासकार तीर्थंकर रॉय यांच्या मते स्पर्धा विषम असूनही भारतीय हातमाग उद्योग ब्रिटिश वसाहतवादाला कधीच पूर्णपणे शरण गेला नाही.

संत कबीरांची ही सुंदर रचना अगदी कुमार गंधर्वांपासून ते लता मंगेशकरांपर्यंत अनेक दिग्गज गायक-गायिकांनी आपापल्या ढंगात गायलेली आहे. संत कबीर

स्वतः विणकर होते. त्यांच्या बऱ्याच निर्गुणी भजनांमध्ये आपल्याला विणकामाचा संदर्भ सापडतो. पण ही कबीरांची सर्वांत प्रसिद्ध रचना. मानवी शरीर म्हणजे दैवी हातांनी विणलेली एक झिरझिरीत चादर आहे, हे रूपक कबीरांनी ह्या पदात वापरलेले आहे.

काहे कै ताना काहे कै भरनी,

कौन तार से बीनी चदरिया ॥

इंगला पिंगला ताना भरनी,

सुखमन तार से बीनी चदरिया ॥

सो चादर सुर नर मुनि ओढ़ी,

ओढ़ि कै मैली कीनी चदरिया ॥

दास कबीर जतन करि ओढ़ी,

ज्यों कीं त्यों धर दीनी चदरिया ॥

ह्या भजनातला पहिलाच विचार प्रश्न रूपाने येतो. कुठलाही कुशल विणकर जेव्हा एखादे वस्त्र हातात घेतो तेव्हा तो सर्वप्रथम त्या वस्त्राचा धागा चाचपतो. ताणा कोणता, बाणा कोणता, सूत किती काउंटचे, हे तो विणकर आधी पडताळून पाहतो. संत कबीरांनी मानवी शरीरासाठी चादरीचे रूपक वापरलेले आहे, कारण कबीराचे ज्ञान हे विणण्याच्या प्रत्यक्ष कृतीतून आलेले ज्ञान आहे. शरीराला वस्त्राची उपमा देणे हा विचार काही भारतीय तत्त्वज्ञानाला नवीन नाही. अगदी वेदांपासून ते गीतेपर्यंत मानवी शरीराला वस्त्राची उपमा दिली गेलेली आहे. पण कबीरांचे रूपक प्रत्यक्ष अनुभवातून आलेले असल्यामुळे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...