डॉ. राजू पाटोदकर
आनंददायी आणि अविस्मरणीय प्रवास करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मग तो एखाद्या गावात मारलेला छोटा फेरफटका असो, किंवा देश-परदेशवारी; मनमुराद आनंद मिळावा असे वाटणे साहजिकच आहे. ह्याच आनंदासाठी प्रवासाची तयारी करताना तसेच प्रवासामध्येही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. आनंददायी प्रवासासाठी महत्त्वाच्या १०१ टिप्स...
१) प्रवासाचे ठिकाण निश्चित करून एकूण प्रवासाचा संभाव्य आराखडा तयार करावा.
२) संबंधित ठिकाणाची सविस्तर माहिती जमा करावी.
३) परिचितांपैकी कोणी त्या ठिकाणी गेलेले असल्यास त्यांच्याकडून माहिती घ्यावी.
४) प्रवासाचा कालावधी व आपले बजेट व्यवस्थित तपासावे.
५) जिथे प्रवासास जायचे आहे तेथील हवामानाची माहिती घ्यावी.
६) त्या भागात कोणी ओळखीचे असतील, तर त्यांचे पत्ते, दूरध्वनी नोंद करून घ्यावेत.