फूडपॉइंट मीनाक्षी काटकर कवठाची चटणी वाढप२ ते ३ व्यक्तींसाठी साहित्यदोन पिकलेली कवठे, ५० ग्रॅम गूळ, ५ ते ६ लसूण पाकळ्या, १ चमचा काळे मीठ, १ चमचा धने-जिरे पूड, ५ ते ६ भाजलेल्या लाल मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर. .कृतीसर्वप्रथम पिकलेली कवठे स्वच्छ धुवावीत. त्यातील गर चमच्याने अलगद एका मोठ्या बाऊलमध्ये काढून ठेवावा. त्यात गूळ चांगल्या प्रकारे हाताने चुरून मिसळावा, जेणेकरून गूळ कवठाच्या आंबटपणाला गोडसर चव देईल. यानंतर त्यात सोललेल्या लसूण पाकळ्या, भाजलेल्या लाल मिरच्या, काळे मीठ आणि धने-जिरे पूड व कोथिंबीर घालून सगळे साहित्य एकत्र करावे. हे मिश्रण एकत्र मिक्सरमध्ये घालून चटणी तयार होईपर्यंत वाटून घ्यावे. चवीनुसार मिठाचे प्रमाण समसमान ठेवावे. ही आंबट, गोडसर आणि थोडीशी तिखट अशी संतुलित चव असलेली चटणी गरमागरम पराठा, पोळी, पुरी किंवा थालीपिठाबरोबर अप्रतिम लागते..द्राक्षांची चटणीवाढप२ ते ३ व्यक्तींसाठीसाहित्यअडीचशे ग्रॅम द्राक्षे, ५० ग्रॅम गूळ, ५ ते ६ लसूण पाकळ्या, १ चमचा काळे मीठ, १ चमचा धने-जिरे पूड, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता.कृतीसर्वप्रथम द्राक्षे स्वच्छ धुऊन घ्यावीत. गूळ किसून किंवा बारीक तुकडे करून घ्यावा. लसूण पाकळ्या सोलून घ्याव्यात. हिरव्या मिरच्या भाजून घ्याव्यात. ह्या सर्व साहित्यात काळे मीठ, कोथिंबीर आणि धने-जिरे पूड घालून सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. चटणी वाटून झाल्यावर ती भांड्यात काढावी. नंतर एका पातेल्यात थोडे तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार करावी. ही फोडणी चटणीवर ओतावी आणि मिसळून घ्यावी. ही आंबट, गोडसर, थोडीशी तिखट आणि खमंग अशी द्राक्षांची चविष्ट चटणी गरमागरम पराठा, पुरी, पोळीबरोबर खावयास द्यावी..भेदराची चटणीवाढप२ ते ३ व्यक्तींसाठीसाहित्यअडीचशे ग्रॅम भेदरे, ५० ग्रॅम गूळ, ५ ते ६ लसूण पाकळ्या, १ चमचा काळे मीठ, १ चमचा धने-जिरे पूड, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, मोहरी, जिरे, हिंग, तेल, कढीपत्ता.कृतीसर्वप्रथम भेदरं स्वच्छ धुऊन घ्यावीत. गूळ चिरून किंवा किसून घ्यावा. लसूण पाकळ्या सोलून घ्याव्यात. हिरव्या मिरच्या थोड्या भाजून घ्याव्यात. हे सर्व साहित्य एकत्र करून त्यात काळे मीठ, कोथिंबीर आणि धने-जिरे पूड घालून साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. चटणी वाटून झाली की ती एका भांड्यात काढावी. नंतर एका छोट्या पातेल्यात थोडे तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करावी. ही खमंग फोडणी चटणीवर ओतावी आणि हलक्या हाताने मिसळावी. ही भेदराची आंबट, गोडसर आणि फोडणीने खमंग झालेली खास चटणी गरमागरम पराठा, पुरी, पोळी किंवा अगदी भाकरीबरोबर द्यावी..स्टार फ्रुट चटणीवाढप२ ते ३ व्यक्तींसाठीसाहित्यपाच ते सहा स्टार फ्रुट, ५० ग्रॅम गूळ, ५ ते ६ लसूण पाकळ्या, १ चमचा काळे मीठ, १ चमचा धने-जिरे पूड, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर.कृतीप्रथम ताजी आणि रसरशीत स्टार फ्रुट्स स्वच्छ धुऊन घ्यावीत. गूळ चिरून किंवा किसून घ्यावा, जेणेकरून तो मिश्रणात सहज मिसळता येईल. लसूण पाकळ्या सोलून घ्याव्यात. हिरव्या मिरच्या थोड्याशा भाजून घ्याव्यात. हे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये घालावे, यात काळे मीठ, धने-जिरे पूड आणि कोथिंबीर घालून मध्यमसर चटणी तयार होईपर्यंत वाटून घ्यावे. ही आंबट, गोडसर, थोडीशी झणझणीत अशी चविष्ट चटणी गरमागरम पराठा, पुरी, पोळीबरोबर सर्व्ह करावी..फुलोरा चटणीवाढप२ ते ३ व्यक्तींसाठीसाहित्यतीन वाट्या चिंचेचा फुलोरा, ५० ग्रॅम गूळ, ५ ते ६ लसूण पाकळ्या, १ चमचा काळे मीठ, १ चमचा धने-जिरे पूड, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर.कृतीसर्वप्रथम चिंचेचा फुलोरा स्वच्छ धुऊन घ्यावा. गूळ किसून किंवा चिरून घ्यावा, जेणेकरून तो चटकन मिसळता येईल. लसूण पाकळ्या सोलून घ्याव्यात. हिरव्या मिरच्या थोड्याशा भाजून घ्याव्यात. ह्या सर्व साहित्य एकत्र करून त्यात काळे मीठ, धने-जिरे पूड आणि कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. चटणी वाटून झाली की ती एका भांड्यात काढावी. ही आंबट, गोडसर चटणी गरमागरम पराठा, पुरीबरोबर खावयास द्यावी..कैरीची चटणीवाढप२ ते ३ व्यक्तींसाठीसाहित्यदोन मोठ्या कैऱ्या, ५० ग्रॅम गूळ, ५ ते ६ लसूण पाकळ्या, १ चमचा काळे मीठ, १ चमचा धने-जिरे पूड, ५ ते ६ लाल मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, तेल, हिंग, मोहरी.कृतीप्रथम कैऱ्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. साले काढून गर खरडून घ्यावा. गूळ चिरून किंवा किसून घ्यावा, जेणेकरून तो चटकन मिसळता येईल. लसूण पाकळ्या सोलून घ्याव्यात. लाल मिरच्या थोड्या भाजून घ्याव्यात. हे सर्व साहित्य एकत्र करून त्यात काळे मीठ, कोथिंबीर आणि धने-जिरे पूड घालावी. हे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये घालून चटणी तयार करून घ्यावी. चटणी वाटून झाल्यावर ती एका वाटीत काढावी. नंतर फोडणीसाठी तेल गरम करावे. त्यात मोहरी घालावी आणि ती तडतडली की त्यात चिमूटभर हिंग घालावा. ही खमंग फोडणी गरम असतानाच चटणीवर ओतावी आणि हलक्या हाताने मिसळून घ्यावी..अंबाडीच्या बोंड्याची चटणीवाढप२ ते ३ व्यक्तींसाठीसाहित्यअडीचशे ग्रॅम अंबाडीच्या बोंड्याच्या पाकळ्या, ५० ग्रॅम गूळ, ५ ते ६ लसूण पाकळ्या, १ चमचा काळे मीठ, १ चमचा धने-जिरे पूड, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता.कृतीप्रथम अंबाडीच्या बोंड्याच्या पाकळ्या निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्याव्यात. गूळ चिरून किंवा किसून घ्यावा. लसूण पाकळ्या सोलून घ्याव्यात. हिरव्या मिरच्या थोड्या भाजून घ्याव्यात. हे सर्व साहित्य एकत्र करून त्यात काळे मीठ, कोथिंबीर आणि धने-जिरे पूड घालून सर्व मिश्रण मिक्सरमध्ये मध्यमसर वाटून घ्यावे. चटणी वाटून झाल्यावर ती वाटीत काढावी. फोडणीसाठी तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार करावी. ही फोडणी चटणीवर घालावी आणि हलक्या हाताने एकत्र करावे..Premium|Face Pack: मॉन्सून फेस पॅक.पेरूची चटणीवाढप२ ते ३ व्यक्तींसाठीसाहित्यअडीचशे ग्रॅम पेरू, २० ग्रॅम गूळ, ५ ते ६ लसूण पाकळ्या, १ चमचा काळे मीठ, मोहरी, जिरे, हिंग, १ चमचा धने-जिरे पूड, ५ ते ६ लाल मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर.कृतीप्रथम पेरू स्वच्छ धुऊन त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून बाजूला ठेवावेत. गूळ किसून घ्यावा, जेणेकरून तो लवकर वितळेल. लसूण पाकळ्या सोलून घ्याव्यात. लाल मिरच्या भाजून जाडसर पूड तयार करून घ्यावी. नंतर एका कढईत थोडे तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि लसूण पाकळ्या घालून खमंग फोडणी करावी. तयार फोडणीत पेरूचे तुकडे घालावेत. लगेचच त्यात किसलेला गूळ, कोथिंबीर, लाल मिरची पूड, काळे मीठ, धने-जिरे पूड घालावी. सर्व साहित्य एकत्र हलवावे. झाकण ठेऊन मंद आचेवर पेरू शिजू द्यावा. थोड्या वेळाने पेरू नरम होतात आणि गूळ वितळून चटणीला आंबट-गोडसर चव देतो. दरम्यान अधूनमधून हलवत राहावे. ही पेरूची चटणी गरमागरम पराठा, पुरी, पोळीबरोबर खावयास द्यावी..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.