leh ladakh
Esakal
डॉ. विनोद भारती, अमेय विनायक गटणे
जिवलग मित्रांसोबतची लेह-लडाख सफर म्हणजे निसर्गाचा अलौकिक अनुभव, भारतीय सैनिकांच्या शौर्याची रोमांचक आठवण आणि आत्मशोधाचा प्रवास. उंच डोंगर, निळसर सरोवरे, वाळवंट, बर्फ आणि सौहार्द अशा विविधरंगी अनुभवांनी सजलेली ही सहल आयुष्यभर मनात कोरली जाईल.
युष्याच्या विविध टप्प्यांवर आम्ही पाचजण - मी विनोद, अमित, मनोज, प्रशांत आणि संतोष - एकमेकांना भेटलो. आमच्या नात्याचे सौंदर्य असे, की एकत्र असताना वय, पद, जबाबदाऱ्या अशा सर्व गोष्टी विरघळून जातात आणि उरते ती फक्त निखळ मैत्री. जिवलग दोस्ती. आनंद देणारी. ऊर्जा देणारी. आम्ही सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करतो, आपापल्या व्यग्र जीवनात गुरफटलेलो असतो. तरीही मैत्री जपण्यासाठी आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी आम्ही दरवर्षी एकत्र प्रवासाला जातो. तीन-चार दिवसांच्या या सहलींमध्ये आम्ही ताजेतवाने होतो.