फूडपॉइंट: सुप्रिया खासनीस
लिंबाचा ठेचा
साहित्य
एक डझन लिंबे, १५ ते २० ओल्या मिरच्या, १ वाटी साखर किंवा गूळ, पाऊण वाटी मीठ, १ चमचा हिंग, दीड चमचा हळद, २ चमचे मेथ्या.
कृती
सर्वप्रथम लिंबाच्या अगदी बारीक फोडी आणि मिरच्यांचे तुकडे करावेत. नंतर मिरच्यांमध्ये मीठ घालून त्या खलात ठेचाव्यात. त्यानंतर त्यात लिंबाच्या फोडी घालून एकत्र थोडेसे ठेचून घ्यावे. त्यामध्ये अर्धा चमचा हिंग, तळलेल्या मेथ्यांची पूड आणि साखर घालून सर्व साहित्य एकत्र नीट कालवावे. उरलेले हिंग आणि हळद घालून फोडणी करून लोणच्यावर घालावी.