
स्वप्ना जाडे कुलकर्णी
जोधपूरचा नहारगढ़ किल्ला म्हणजेच आजच्या भाषेत राजाचं ‘समर होम’च म्हणावं लागेल. इथे गरमी जाणवणार नाही अशी रचना केली आहे. राजाच्या आठ राण्यांचे आठ महाल, पट्टराणीचा एक आणि राजाचा एक असे दहा महाल इथं आहेत. फुलापानांची पेंटिंग्ज, अनेक दालनं, छुप्या वाटा, खिडक्यांची पद्धतशीरपणे केलेली रचना बघताना खूप मस्त वाटलं.
आपल्या देशात ‘अतिथी देवो भव’ असं म्हणून पाहुण्यांचं स्वागत करण्याची, त्यांना अगदी देव मानून सन्मान करण्याची पद्धत आहे. प्रत्येक राज्य वेगळी संस्कृती, खाद्यपदार्थ, वेशभूषा अशा अनेक विविधतांनी नटलेलं आहे. असंच एक नितांत सुंदर राज्य म्हणजे राजस्थान. राजस्थानची ‘पधारो म्हारे देस’ ही साद गेली अनेक वर्षं खुणावत होती. शेवटी डिसेंबरमध्ये जाण्याचं ठरवलं.