Premium|Acidity and Lifestyle : पीपीआयमुळे व्हिटॅमिन-कॅल्शियमची कमतरता, हाडे ठिसूळ होण्याचा आणि किडनीवर ताण वाढण्याचा इशारा

Proton Pump Inhibitors : चुकीच्या आहार-विहारामुळे वाढणाऱ्या ॲसिडिटीवर अनेकजण स्वतःहून पीपीआय गोळ्या घेतात; मात्र दीर्घकाळ वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधांचा अतिवापर पचनसंस्था आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
Proton Pump Inhibitors

Proton Pump Inhibitors

esakal

Updated on

डॉ. सुबोध देशमुख

ॲसिडिटी हा आपल्या चुकीच्या सवयींचा शरीराने दिलेला इशारा असतो. वेळेवर न जेवणे, प्रमाणापेक्षा जास्त चहा-कॉफी पिणे, मैदा व तळलेले पदार्थ खाणे, रात्री उशिरा जेवणे, मानसिक ताण आणि दारू-सिगारेटचे व्यसन ही ॲसिडिटीची मुख्य कारणे असतात. ॲसिडिटीच्या मूळ कारणांवर काम न करता केवळ गोळ्या खाऊन ॲसिड दाबून ठेवणे म्हणजे घराला आग लागल्यावर अलार्मची वायर कापण्यासारखे आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवणे यांसारख्या ॲसिडिटीच्या तक्रारी अत्यंत सामान्य झाल्या आहेत. अनेक लोक या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याऐवजी मेडिकल स्टोअरमधून थेट ‘प्रोटॉन पंप इनहिबिटर्स’ (पीपीआय) म्हणजेच गॅस पास होण्यासाठीच्या गोळ्या विकत घेतात आणि त्या रोज सकाळी उपाशी पोटी खाण्याची सवय लावून घेतात. सुरुवातीला या गोळ्यांमुळे तात्काळ आराम मिळतो, पण कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता वर्षानुवर्षे या गोळ्यांचा अतिवापर करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. पोटात तयार होणारे ॲसिड हा काही आजार नसून, ती पचनसंस्थेची एक अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक ढाल असते. पीपीआय गोळ्यांच्या अतिवापरामुळे पचनसंस्थेत आणि संपूर्ण शरीरात कसा गंभीर बिघाड होतो याचे वैज्ञानिक वास्तव समजून घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com