Book buying
Esakal
सुजित काळे
परवा घरी येताना सिग्नलला एक स्कूटर दिसली. पुढे वडील आणि मागे मुलगी बसलेली. बहुतेक मंडईतूनच येत असावेत कारण मुलगी मागे बसून भाजीच्या पिशवीमधून मस्तपैकी भुईमुगाच्या शेंगा खात होती. त्या क्षणी जाणवलं, सगळं ‘ॲड टू कार्ट’ करायचं नसतं काही गोष्टी ‘ॲड टू मेमरी’ही करायच्या असतात, कारण आठवणी घरपोच मिळत नाहीत!
‘‘मी पाचवीत असताना एकटा सायकलवर जाऊन, तो इतका प्रचंड रहदारीचा रस्ता जीव मुठीत धरून पार करून, आपल्याला होळीसाठी गवऱ्या आणल्या, ते विसरलीस वाटतं!’’
‘‘राजा, चार-पाच वर्षांनी तुझी लेक पाचवीला जाईल, तेव्हादेखील तू हाच दाखला देणार आहेस का? तुलाच खावीशी वाटली म्हणून शंकरपाळी करायला घेतले आणि नेमकं दूध संपलं म्हणून ‘जाऊन आण’ म्हटलं तर अशी उलटी उत्तरं देतोयस? थांब, त्या वाण्याला व्हॉट्सॲप करते. देईल तो आणून घरी. आणि तू पाचवीत असताना जर हे ॲमेझॉन नाहीतर फ्लिपकार्ट असतं ना, तर त्यावरच गवऱ्या ऑर्डर केल्या असत्या. तुझा जीव तरी धोक्यात घातला नसता!’’
आई असं म्हणाली आणि क्षणभर वाटलं, खरंच मी शाळेत असताना जर आंतरजाल असतं आणि ऑनलाइन खरेदी करता आली असती, तर काय धमाल करता आली असती!