
संपादकीय : प्राणी-राजनय
शंकर गेली तेवीस वर्षं एकटा राहातोय. त्याचं खाणंपिणं, अंघोळपांघोळ पाहणाऱ्या माणसांशिवाय आणखी कोणी माणसं त्याला बघायला वगैरे येतात का माहिती नाही, पण येत असली तरी शंकर जवळजवळ एकांतवासातच आहे. त्याच्याविषयी जे वाचायला मिळतं त्यावरून असं दिसतंय, की शंकर बराचसा काळ साखळदंडांनी जखडलेलाच असतो.