Premium|AI Impact on Data Entry Jobs India 2026 : एआयमुळे डेटा एंट्री नोकऱ्यांवर परिणाम, पण भारतात २०२६ पर्यंत लाखो नव्या करिअर संधी

How Parents Should Guide Students About AI Career : कॉम्प्युटर क्रांतीप्रमाणेच एआयमुळे क्लर्कच्या नोकऱ्या कमी होण्याची भीती असली, तरी बदल स्वीकारणाऱ्यांसाठी एआयच्या अवाढव्य छत्रीखाली लाखो नव्या आणि अफाट पगाराच्या करिअर संधी कशा निर्माण होत आहेत, याचा वेध घेणारा विशेष लेख.
AI Impact on Data Entry Jobs India 2026

AI Impact on Data Entry Jobs India 2026

esakal

Updated on

​रोहित पांढारकर

एआयमुळे डेटा एंट्री किंवा साध्या क्लर्कच्या काही नोकऱ्या कमी होतील. पण जेव्हा कॉम्प्युटर्स आले होते, तेव्हाही अशीच भीती होती. प्रत्यक्षात कॉम्प्युटरमुळे बँकिंग आणि सेवा क्षेत्रात लाखो नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. एआयचेही तसेच आहे. बदल स्वीकारणारा या स्पर्धेत टिकेल.

सध्याच्या युगात ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ म्हणजेच एआय आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण कळत-नकळत अनेकदा एआयचा वापर करत असतो. पण मनात एक अनामिक भीतीही असते. कुणी सांगतात, एआयमध्ये अफाट पगार मिळतो, तर एखादे पालक काळजीने विचारतात, ‘‘सगळे काम जर एआयच करणार असेल, तर माझ्या मुलाच्या नोकरीचे काय होणार?’’ पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, एआय हे केवळ इंजिनिअरिंगपुरते मर्यादित क्षेत्र नाही. एआय ही एक तंत्रज्ञानाची अवाढव्य छत्री आहे. एखादी इमारत उभी करण्यासाठी फक्त इंजिनिअर असून चालत नाही, तर आर्किटेक्ट, डिझायनर, सुपरवायझर, कायदेशीर सल्लागार आणि मॅनेजमेंटचीही गरज असते, अगदी तसेच एआयच्याही जगात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com