

Ajanta Caves
esakal
अमोघ वैद्य
शेवटी डोंगराच्या एका तीव्र वळणावर ते पोहोचले आणि क्षणभर तिथंच सगळे स्तब्ध झाले. कारण समोर जे उलगडलं, ते कोणाच्याही कल्पनेपलीकडचं होतं! उंच कातळात कोरलेलं गुहाद्वार, रांगेत उभ्या असलेल्या लेण्या, आणि त्या साऱ्या अवकाशात दाटलेली गूढ शांतता; जणू काळानं श्वास रोखून धरला होता. त्या क्षणी स्मिथच्या समोर उभे राहिले ते केवळ दगड नव्हते, ते होतं शतकानुशतके विस्मरणात गेलेलं एक विलक्षण सौंदर्य! जणू स्वर्गच!