
प्रसाद नामजोशी
१९६६चा सुमार. इऑन प्रॉडक्शन्सचा पाचवा बॉन्डपट फक्त जपानच्याच पार्श्वभूमीवर चित्रित करायचं ठरलं. साहजिकच बॉन्ड गर्ल्ससुद्धा जपानी असण्याची आवश्यकता होती. जपानमध्ये अभिनेत्रींची कमतरता नव्हती. प्रश्न होता तो त्यांच्या इंग्रजी बोलण्याचा. अखेर सूकी आणि किसी या दोन बॉन्ड गर्ल्सच्या भूमिकांसाठी मि हामा आणि अकिको वाकाबायाशी या दोघींची निवड झाली. इंग्रजी काय, आपण शिकवून टाकू या, असं निर्मात्यांना वाटलं आणि त्यासाठी या दोघींना इंग्लंडमधल्या दोन वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये इंग्रजी संभाषण शिकण्यासाठी ठेवण्यात आलं.