Premium|History of Artificial Intelligence : यंत्राला खरंच विचार करता येतो का? ७५ वर्षांपूर्वी ॲलन ट्युरिंग यांनी विचारलेल्या 'त्या' प्रश्नाने जगाचे भविष्य कसे बदलले?

AI Development Stages : कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास आणि ट्युरिंग चाचणीपासून ते 'एआय विंटर्स' पर्यंतचा प्रवास रंजक असून, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती आणि त्याचे विकासाचे टप्पे समजून घेणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.
AI Development Stages

AI Development Stages

esakal

Updated on

डॉ. अनघा केसकर

आज कुठंही पाहिलं तरी एका विषयावरची चर्चा नेहमी कानावर पडते - एआय आणि त्यामुळे भविष्यात होऊ पाहणारं मानवी उपजीविकेच्या साधनांवरचं आक्रमण. ही समस्या किंवा वास्तव म्हणा, आज आपल्या उंबरठ्यावर येऊन उभं आहे. त्यामुळे या विषयाबाबत आपल्याला आता अनभिज्ञ राहून चालणार नाही. ‘हा आमचा प्रांत नाही’, ‘आम्हाला त्यातलं काही कळत नाही’ असा पवित्रा फार काळ घेता येणार नाही. याचसाठी अगदी सोप्या भाषेत एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयाची माहिती आणि त्याच्या विकासाचे टप्पे सविस्तर पाहू या...

ट्युरिंग चाचणी

एआय क्षेत्रातल्या प्रगतीचे टप्पे रोचक आहेत. १९५०मध्ये या दृष्टीनं पहिला प्रयत्न झाला. ब्रिटनमध्ये ॲलन ट्युरिंग नावाचे गणितज्ज्ञ होऊन गेले. ‘यंत्राला विचार करता येईल का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि विचारपद्धतीलाच नवं वळण मिळालं. त्या वेळपर्यंत मोजणीयंत्राचा (कॅलक्युलेटर) आणि संगणकाचा वापर काहीसा प्रगत झाला असला, तरी आजच्या तुलनेत तो प्राथमिक अवस्थेत होता. त्यामुळेच यंत्राकडून अधिक बौद्धिक कामं करून घेता येतील का, मानवी मेंदूप्रमाणे यंत्र काम करू शकेल का, असा विचार ट्युरिंग यांच्या मनात आला.

एखादं यंत्र विचार करू शकतं का, हे ठरविण्यासाठी त्यांनी काही चाचण्या ठरवल्या. त्या चाचणीचं ढोबळ स्वरूप असं होतं - निवाडा करण्यासाठी एखादा निःपक्षपाती माणूस नेमायचा आणि यंत्राला आणि माणसाला स्वतंत्रपणे काही समान प्रश्‍न विचारायचे. निवाडा करणाऱ्या व्यक्तीला कोणतं उत्तर कोणी दिलं आहे याबाबत अंधारात ठेवायचं. उत्तराच्या दर्जावरून कोणतं उत्तर माणसानं दिलं आहे आणि कोणतं यंत्राने दिलं आहे हे ठरवता आलं नाही, यंत्रानं दिलेली उत्तरं माणसाच्या उत्तरांसारखी बेमालूम असली तर ते यंत्र चाचणीमध्ये यशस्वी झालं असं ठरत असे.

मार्कस चाचणी

पुढील काळात संशोधकांनी ट्युरिंग यांच्या या चाचण्यांमध्ये काही सुधारणा केल्या. त्यामध्ये गॅरी मार्कस या संशोधकाचा समावेश करावा लागेल. मार्कस यांनी चाचणीत बदल केला. यंत्राला व्हिडिओ क्लिप दाखवायची. त्यात काय दाखवलं आहे, याचा माणसाला जसा अर्थ समजतो तसाच तो यंत्राला कळतो की नाही, हे आजमावायचा प्रयत्न केला. यामध्ये समजणं, त्याचा अर्थ लावणं आणि त्यात अभिप्रेत असलेला विनोद किंवा अन्य भावना उमजणं अशा तीन गोष्टी अपेक्षित होत्या. काय घडत आहे, त्याचा संदर्भ काय, त्यात विनोदाचा भाग आहे की वक्रोक्ती आहे हे मानवी मेंदूप्रमाणे त्याला कळतं की नाही याची चाचणी केली गेली. दिलेल्या माहितीमधल्या वारंवार येणाऱ्या रचना (पॅटर्न्स) यंत्राला समजतात, पण त्यातील गोष्टींचा सखोल अर्थ समजण्यात अडचणी येतात, असा मार्कस यांचा दावा होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com