Premium|Guru Shishya Tradition in Music : सूरमयी गुरू-शिष्य परंपरा

The Gurus Behind Amar Oak's Music : प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांच्या सांगीतिक प्रवासात वडील, साने सर आणि भावे सर यांच्यासारख्या गुरूंनी घडवलेल्या संस्कारांचा आणि भारतीय गुरु-शिष्य परंपरेचा प्रेरणादायी मागोवा.
Guru Shishya Tradition in Music

Guru Shishya Tradition in Music

esakal

Updated on

अमर ओक

​प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांचा सांगीतिक प्रवास केवळ सराव किंवा व्यावसायिक कामगिरीपुरता मर्यादित नाही. हा प्रवास म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या गुरूंच्या मार्गदर्शनातून घडलेली एक निरंतर प्रक्रिया आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या या सांगीतिक जडणघडणीचा आणि त्यामागील गुरू-शिष्य परंपरेचा हा धावता वेध...

भारतीय शास्त्रीय संगीताच्या अथांग क्षेत्रात जेव्हा एखादा साधक आपली सांगीतिक यात्रा सुरू करतो, तेव्हा ती केवळ एका वाद्याच्या अभ्यासापुरती मर्यादित नसते. हा प्रवास म्हणजे स्वतःच्या कौशल्याचा, शिस्तीचा आणि स्वरांच्या माध्यमातून अभिव्यक्तीचा शोध असतो. बासरी हे वाद्य वरवर पाहता केवळ पोकळ बांबूचा एक तुकडा असते, ज्याला ठरावीक अंतरावर छिद्रे पाडलेली असतात. मात्र, जेव्हा हे वाद्य वाजवणाऱ्याला योग्य गुरूंचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभतात, तेव्हा त्यातून निघणारे सूर एका सामान्य बांबूला कलेच्या माध्यमात रूपांतरित करतात, असे मला वाटते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com