Premium|Amazing rivers of the world : जगातील सर्वात स्वच्छ, खोल आणि उकळत्या पाण्याच्या नद्या; निसर्गाच्या अद्भुत चमत्कारांची ओळख

World's Most Unique Rivers : जगातील सर्वात स्वच्छ, सर्वात खोल, उकळत्या पाण्याची आणि कायदेशीर व्यक्तीचा दर्जा मिळालेल्या नद्यांची वैशिष्ट्ये उलगडणारा, निसर्गातील अद्भुत चमत्कारांचा वेध घेणारा लेख.
Amazing rivers of the world

Amazing rivers of the world

esakal

Updated on

नदी हे निसर्गाचे अमूल्य लेणे आहे. डोंगरांच्या कुशीत जन्मणाऱ्या आणि तिथून मोठे अंतर पार करून समुद्राला मिळणाऱ्या नद्या मानवी संस्कृतीच्या साक्षीदार आहेत. या नद्यांची भौगोलिक वैविध्यता आपल्याला थक्क करणारी आहे. जाणून घेऊ अशा काही चित्तवेधक नद्यांविषयी...

जगातील सर्वात स्वच्छ नदी

जगातील सर्वात स्वच्छ नदी आपल्या भारतात वाहते. मेघालयातील उमंगोट नदी सर्वात स्वच्छ नदी आहे. या नदीत प्रदूषण होत नसल्यामुळे हिचे पाणी स्वच्छ व पारदर्शी आहे. पारदर्शक पाण्यामुळे नदीत विहार करणाऱ्या बोटी हवेत तरंगत असल्याचा भास होतो. ही नदी बांगलादेशातील गोयेन नदीला जाऊन मिळते.

जगातील सर्वात खोल नदी

काँगो नदी ही सर्वात खोल नदी आहे. ही नदी २२० मीटर (७२० किलोमीटर) खोल असून, आफ्रिका खंडात वाहते. काँगो नदीच्या खोलीमुळे तिच्या तळाशी सूर्यप्रकाश पोहोचत नाही. ही नदी अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. काँगो नदी विषुववृत्त दोनदा ओलांडते, हे तिचे वैशिष्ट्य!

उकळत्या पाण्याची नदी

पेरू देशातील शानाय-टिम्पिश्‍का या नदीतील पाणी उकळते व गरम आहे. विशेष म्हणजे, या नदीच्या आजूबाजूच्या परिसरात दूरपर्यंत ज्वालामुखी नसूनही हे पाणी उकळते आहे. भूगर्भातील अतिउष्णतेमुळे पाणी सतत उकळत असते, परिणामी येथे कोणत्याही प्रकारचे प्राणी व वनस्पती आढळत नाहीत. स्थानिक आदिवासी लोक या नदीला पवित्र मानतात.

कायदेशीर व्यक्तीचा दर्जा मिळालेली नदी

न्यूझीलंडमधील वांगनुई ही नदी कायदेशीररित्या व्यक्तीचा दर्जा मिळालेली जगातील एकमेव नदी आहे. या नदीला कायद्याच्या दृष्टीने व्यक्तीप्रमाणेच हक्क आणि संरक्षण मिळाले आहे. या नदीत प्रदूषण करणे किंवा तिचे नुकसान करणे हे माणसाला इजा पोहोचविण्यासारखे आहे. असे केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. वांगनुई नदीला न्यूझीलंडमधील माओरी या आदिवासी जमातीच्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com