Premium|Amruta Bendre : गाण्यातून विनोदाची अनोखी मेजवानी; अमृता बेंद्रे कशी बनली स्टँडअप कॉमेडियन?

Amruta Bendre Standup Comedy : गाण्यातून विनोद सादर करणारी स्टँडअप कॉमेडियन अमृता बेंद्रे स्वतःला आई, गृहिणी आणि कॉमेडियन मानते. आईकडून मिळालेला संगीताचा वारसा आणि वडिलांकडून आलेली विनोदबुद्धी यांमुळे तिची वेगळी ओळख तयार झाली.
Amruta Bendre Standup Comedy

Amruta Bendre Standup Comedy

esakal

Updated on: 

इरावती बारसोडे

एखाद्याला खळखळून हसवणं हे एक मोठं आव्हानच असतं. त्यातही गाण्यातून विनोद करणं आणखी अवघड. पण अमृता गाण्यातून विनोद करते. अमृता बेंद्रे... एक आई, एक गृहिणी आणि कॉमेडियनसुद्धा! कोणत्याही स्त्रीला पुरुषासारखं खदाखदा दिलखुलास हसता आलं पाहिजे असं तिचं म्हणणं. त्यांना हसवण्याचा विडा तिनं उचललाय. अशा या मॉमिक - मॉम कॉमिक अमृताबरोबर मारलेल्या गप्पा...

तू स्टँडअप कॉमेडियन आहेस, अशी कॉमेडियन जी गाण्यातूनही कॉमेडी करते... गाणं आणि कॉमेडी हे सगळ्यांना सहजी जमत नाही. तू कसं जमवलंस?

अमृता बेंद्रे ः आपल्याला सगळ्यांनाच कुठली ना कुठली गोष्ट अवघड वाटते किंवा सोपी वाटते. रोज नेमक्या वेळी उठून, आवरून ऑफिसला जाऊन आठ तास काम करणाऱ्यांचं, घरचीही कामं करणाऱ्यांचं मला खूप अप्रूप वाटतं. मी केलाय ऑफिसला जायचा प्रयत्न, तोही तीनदा. नाही जमलं मला. प्रत्येकाला अशी एखादी गोष्ट येते जी बाकी लोकांना अवघड वाटू शकते. आपण कसं वाढलोय आणि आपला स्वभाव या दोन्ही गोष्टींवर ते अवलंबून असतं. माझ्यासाठी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. माझ्या आईची बाजू म्युझिकल आहे आणि बाबांची बाजू फनी, कॉमिकल आहे. दोन्ही घरांमध्ये राहून ते रोजच बघत आलीये. आईकडच्या एखाद्या कार्यक्रमाला भेटलो, की सगळेच एकेक करून गाणं म्हणतात. ‘फनी’बद्दल बोलायचं, तर शाळेत आपोआप मित्र-मैत्रिणी एकमेकांबरोबर मजेशीरच वागतात. माझी शाळा इंग्लिश मीडियम असली तरी पुण्यात होती. मी तेव्हा पुलं खूप ऐकले, मित्र-मैत्रिणींनाही पुलं माहिती होते. बारीकसारीक नाटकं करणं, बघणं हे नॉर्मल होतं. घरातही या गोष्टी कानावर पडत होत्या. शाब्दिक कोट्या करणं हे तर आमच्याकडे असतंच. घरामध्ये चॅलेंज दिल्यासारखे जोक्स केले जातात. त्यामुळे गाणं आणि विनोद यांचा मला आनुवंशिकच वारसा मिळालाय, असं मला वाटतं. लोकांना वाटतं हे अवघड आहे, पण मला ते उपजत मिळालंय. इट्स अ ब्लेसिंग आय हॅव!

Loading content, please wait...