Premium|Anahat Singh Squash : १८व्या वर्षी अनाहत सिंगचा विश्वविजय; आता ऑलिंपिकचे लक्ष्य

Anahat Singh’s Rise in Squash : अवघ्या १८व्या वर्षी जागतिक ज्युनिअर स्क्वॉश विजेतेपद पटकावणाऱ्या अनाहत सिंगसमोर आता लॉस एंजलिस ऑलिंपिकचे लक्ष्य आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरी तिच्या स्वप्नासाठी निर्णायक ठरणार आहे.
Anahat Singh’s Rise in Squash

Anahat Singh’s Rise in Squash

esakal

Updated on

किशोर पेटकर

स्क्वॉश कोर्टवर अनाहतने लहान वयातच मोठी कीर्ती मिळविली. तीन वर्षांपूर्वी चीनमधील हांग् चौंऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके जिंकली, तेव्हा अनाहत फक्त १५ वर्षांची होती. तेव्हा तिला महिला सांघिक व मिश्र दुहेरी ब्राँझ पदके मिळाली होती. त्यापूर्वी २०२२मध्ये वयाच्या १४व्या तिने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पण केले होते.

स्क्वॉशमध्ये ज्युनिअर मुलींच्या स्पर्धेत इजिप्तच्या दीड दशकांच्या वर्चस्वाला यशस्वीपणे शह देताना भारताच्या अनाहत सिंगने जगज्जेतेपदाचा किताब पटकावला. स्क्वॉशमध्ये विश्‍वविजेतेपदाचा पराक्रम साधणारी १८ वर्षीय अनाहत पहिली भारतीय ठरली. अंतिम लढतीत दिल्लीच्या या जिगरबाज मुलीने इजिप्तच्या रुकाया सालेमवर मात केली. गतवर्षी तिने जागतिक ज्युनिअर स्क्वॉश स्पर्धेत ब्राँझपदकाची कमाई केली होती. यावेळी कॅनडात झालेल्या स्पर्धेत जिद्दीने लढताना पदकाचा रंग सोनेरी केला. २०२८मध्ये होणाऱ्या लॉस एंजलिस ऑलिंपिक स्पर्धेत स्क्वॉश खेळ पदार्पण करेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com