Premium|Animal shelter story : अपंग प्राण्यांच्या आयुष्याला नवी आशेची वाट

Panavatha Ashram : नागदंशानंतर आयुष्याला मिळालेली नवी दिशा, अपंग व अनाथ प्राण्यांसाठी उभा राहिलेला पाणवठा आश्रम, अवनी-चिंगीसारख्या प्राण्यांच्या प्रेरणादायी पुनर्वसन प्रवासाची भावस्पर्शी कहाणी.
Animal shelter story

Animal shelter story

esakal

Updated on

गणराज जैन

प्राण्यांबद्दलचं माझं प्रेम व जिज्ञासा वाढत गेली, पण अर्थात हे काही एका दिवसात झालं नाही. या सगळ्याला अनेक चांगल्या-वाईट घटना, प्रसंग कारणीभूत ठरले. नागदंश तर माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. कसाबसा वाचलो या घटनेतून. हे मिळालेलं वाढीव आयुष्य प्राण्यांच्या सेवार्थ देण्याचं ठरवलं, आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज पाणवठा हा केवळ अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम उभा आहे...

अवघ्या १४ दिवसांचं श्वानाचं एक पिल्लू आईचं दूध पीत असताना त्या आईच्या अंगावरून गाडी गेली... आईचा जागेवरच मृत्यू झाला आणि तिच्या शरीराखाली अडकलेल्या या पिल्लाला एक डोळा आणि पाय गमवावा लागला. पण आज सात वर्षांनंतर ते पिल्लू, म्हणजे आमची सगळ्यांची लाडकी अवनी पाणवठा आश्रमात आनंददायी आयुष्य जगत आहे. अर्थात आजही तिच्याजवळून एखादी गाडी गेली किंवा एखादा मोठा आवाज ऐकू आला तरी तिचं अंग कापू लागतं. तसंच आणखी एक श्वानाचं बाळ म्हणजे चिंगी. चिंगी जन्मापासून चारही पायांनी पंगू आहे. तरीही गेली चार वर्षं आश्रमात आनंदानं जगत आहे. केवळ कुत्रीच नव्हे, तर मांजरी, गायी, घोडे, गाढवं, माकडं, मगर, मोर, नीलगाय अशा अनेक प्राण्यांनी पाणवठाचा प्रवास समृद्ध केला आहे. त्यांच्याबद्दल बोलायचेच आहे, पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली हे सांगण्याचा आधी प्रयत्न करतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com