
प्राची गावस्कर
माणूस आणि निसर्गाचे नाते चिरंतन आहे. माणसाला कोलाहलातून सुटका हवी असेल, तर तो निसर्गाच्या कुशीत धाव घेतो. प्राणी, पक्ष्यांचे अद्भुत जग माणसाला वेगळ्या दुनियेत घेऊन जाते. रंगांची उधळण, नैसर्गिक आवाजांची मैफल माणसाला नवी ऊर्जा देते, त्यामुळे निसर्गात रमणे सर्वांनाच आवडते.