‘आहार, विहार, सदाचार आणि सुविचार’ ह्या चतुःसूत्रीचा आपल्याला हळूहळू विसर पडत चाललाय का?

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर। जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर॥
self care
self careEsakal

अतिथी संपादकीय

डॉ. सुरेश शिंदे, ज्येष्ठ वैद्यकशास्त्र तज्ज्ञ

माझ्या लहानपणी आमच्या घरी एक वृद्ध स्त्री खुळखुळे विकण्यासाठी येत असे व जाताना ‘तुझा लेक म्हातारा होईल’ असा आशीर्वाद देऊन जात असे. त्यावेळी मला तिचा राग येत असे. पण खरोखरच म्हणाल तर ‘म्हातारा होणे’ आणि आयुष्याची शंभरी गाठणे ही अनेक अडथळ्यांची कठीण शर्यतच आहे.

आपला देह, आपले आरोग्य हे जणू ‘एक’ ह्या अंकाप्रमाणे आहे. आपण कमावलेले मानसन्मान, मालमत्ता इत्यादी म्हणजे ह्या एक या अंकानंतर येणारी अनेक ‘शून्ये’ आहेत.

जितकी जास्त शून्ये तितकी त्या एकाची किंमत अधिक वाढते. पण जर हा ‘एक’च नसेल तर सर्व गोष्टी म्हणजे जणू एक भलामोठे शून्य! आपल्या पूर्वजांनी अनेक नियमांद्वारे देहाची काळजी घेण्याची शिकवण दिली आहे. निरोगी शरीराचे महत्त्व सांगणारे एक छान गीत आहे -

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com