किशोर पेटकर
पॅरिस ऑलिंपिकमध्ये स्वप्न भंगलेल्या अर्जुन बबुताने लिमा विश्वकरंडक स्पर्धेत रौप्यपदक जिंकून आत्मविश्वास पुन्हा मिळवला आहे.
गतवर्षी पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचा १० मीटर एअर रायफल प्रकारातील नेमबाज अर्जुन बबुता याचा स्वप्नभंग झाला. केवळ अर्जुनच नाही, तर सर्व देशवासीयही या अपयशामुळे निराश झाले. ऑलिंपिक ब्राँझपदक थोडक्यात हुकले आणि अर्जुनला चौथे स्थान मिळाले.