gift
Esakal
श्रुती भागवत
आपण नेहमी स्वतःसाठी खरेदी करत असतो; कधी गरज म्हणून, कधी हौस म्हणून! पण दुसऱ्याला देण्यासाठी खरेदी करण्यातही तितकाच आनंद आहे. आपल्या आयुष्यात दुसऱ्याला काही देण्याचे म्हणजेच गिफ्ट देण्याचे प्रसंग अनेकदा येत असतात, त्यामुळे गिफ्टची खरेदी करताना या काही टिप्स लक्षात ठेवा...
गिफ्ट किंवा भेटवस्तू देणं म्हणजे केवळ एखादी वस्तू देणं नाही, तर समोरच्याला तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस, हे शब्दांशिवाय सांगण्याची एक सुंदर पद्धत आहे. योग्य गिफ्ट दिलं, तर ते नात्यांमध्ये गोडवा वाढवतं, आठवणी निर्माण करतं आणि दोघांच्याही मनात आनंदाची भावना ठेवून जातं.
गिफ्ट घेताना जितका आनंद मिळतो तितकाच, कदाचित त्याहून अधिक आनंद गिफ्ट देताना मिळू शकतो. गिफ्ट घेणाऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू, आश्चर्य, डोळ्यातली चमक हे सगळं पाहणं म्हणजे गिफ्ट देण्याचं खरं फळ. त्यासाठी गिफ्टची किंमत काय आहे हे महत्त्वाचं नाही; ते मनापासून दिलेलं असणं जास्त महत्त्वाचं.