गोपाळ कुलकर्णी
कृत्रिम बुद्धिमत्तेनं जगात नवा सिलिकॉन पडदा उभा केला आहे. खरंतर ही दोन वेगळ्या जगांची निर्मिती आहे. यात भेदाभेद असणं अपरिहार्य आहे; जशा सुखसोई वाढत जातील, त्याच प्रमाणात विषमताही वाढेल. देशाच्या बाबतीत ज्याच्याकडे ‘डेटा पॉवर’ तो अन्य देशांचे कान पिळणार; व्यक्तीच्या बाबतीत ज्याच्याकडे अधिक कौशल्ये तिलाच किंमत मिळणार.
शांघाय, सॅन फ्रान्सिस्कोची सुबत्ता वाढणार, तर इतर काही शहरांची आर्थिक पत घसरणार. वैश्विक तापमानवाढीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करता येईल, पण त्यावर तोडगा काढायला वैश्विक सहकार्याची आवश्यकता भासेल आणि नेमकं तेच या पडद्यामुळे हरवत जाणार... म्हणूनच नव्या विरोधाभासांच्या जगात एआयला नैतिक चौकटीत बांधणं तितकंच आव्हानात्मक अन् आवश्यकही ठरत आहे.