AI and Robotics in Education in India
डॉ. भूषण पटवर्धन
शिक्षण क्षेत्रामध्ये एआयचा वापर वाढला, तरीही भविष्यामध्ये प्रामाणिक शिक्षकांचे योगदान अद्वितीय व शाश्वत राहील. एआय तंत्रज्ञान शिक्षकांना साहाय्यक नक्कीच ठरू शकेल, परंतु त्यांना पर्याय होऊ शकणार नाही. मात्र कालानुरूप शिक्षकांनाही आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करावे लागतील.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. विशेषतः या दशकामध्ये शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. कोविडच्या काळामध्ये ऑनलाइन एज्युकेशनमध्ये मोठी क्रांती झाली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२०मार्फत डॉ. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली भारतातील शिक्षणाला नवी दिशा देण्याचे मोठे कार्य घडले आहे.