
आदित्य सरपोतदार
एआयबाबतीतले नियम, अटी, कायदे हळूहळू स्ट्रिक्ट व्हायला लागले आहेत, असं दिसतं. सध्या हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइमसारखे प्लॅटफॉर्म्स त्यांच्याकडे दाखवल्या जाणाऱ्या कंटेन्टमधील आर्टवर्क नीट तपासतात. स्क्रीनवर दिसणारं आर्टवर्क तयार करण्यासाठी एआय वापरलं असेल, तर ते बदलायला लावतात.
सध्या भारतीय मनोरंजनविश्वात वेगवेगळ्या टप्प्यांवर एआयचा वापर होतोय. गेल्या दोन-तीन वर्षांत हे प्रमाण वाढताना दिसतंय. प्रत्येक क्रिएटिव्ह, टेक्निकल, लॉजिस्टिक्स आणि प्रॉडक्शन विभाग त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं एआयचा वापर करताहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सची अधिकाधिक ॲप्स डेव्हलप होताहेत. ही ॲप्स बऱ्यापैकी हँडी आणि वापरायला सोपी आहेत. पण एक टूल म्हणून एआयचा वापर होत असला, तरी त्यावर अवलंबित्व आहे असं म्हणता येणार नाही.
काही उदाहरणं देऊन हे स्पष्ट करता येईल. मुंज्या चित्रपटाच्यावेळी आम्ही जेव्हा प्रॉडक्शन विभागासोबत बसून प्लॅनिंग करत होतो, तेव्हा माझ्या टीमनं शेड्युलिंग करणं, ब्रेकडाउन्स करणं, मेल ड्राफ्ट करणं, कॉन्ट्रॅक्ट्स तयार करणं अशा अनेक कामांसाठी एआय टूल्स वापरली होती.
ज्या कामांसाठी अनेक मॅन अवर्स लागायचे, ती बरीचशी कामं एआयमुळे खूप फास्ट होऊ लागली आहेत, हे जाणवलं. प्रोजेक्ट शीट्स, शूटिंगचे दैनंदिन रिपोर्ट््स एआयमुळे पटपट तयार होत होते.