अंकित भार्गव
एआय तंत्रज्ञान उत्पादन क्षेत्रातली गुंतागुंतीची आव्हाने सोडवण्यास मदत करू शकते आणि ग्राहकांच्या सतत बदलत जाणाऱ्या अपेक्षा/ मागण्या पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरू शकते, हे उत्पादन क्षेत्रात सर्व स्तरांवर काम करणाऱ्या लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे.
उत्पादन क्षेत्राने नेहमीच मानवी उत्क्रांतीच्या पिरॅमिडमध्ये ‘पाया’ची भूमिका बजावली आहे, आजही बजावत आहे आणि पुढेही बजावत राहील. उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काही नवीन बाब नाही. अलीकडच्या अनिश्चिततेच्या काळात उत्पादन क्षेत्राने नवीन बदल स्वीकारणे अनिवार्य झाले आहे.
मशिन लर्निंग अल्गोरिदमचा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान कार्यान्वित केले जाते. त्यामध्ये व्यवसाय प्रक्रियेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी डेटाचा वापर करून संगणकाला आकलनात्मक प्रक्रिया शिकणे, समस्या सोडविणे आणि निर्णय घेणे इत्यादी बाबतींत सक्षम केले जाते.
या नवीन तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रांमधील उत्पादन प्रक्रियांसंदर्भात टाळता न येण्याजोगे आणि मोजता येणारे परिणाम मिळाले अाहेत.