Prmeium|Asian Koel Bird : वसंताची चाहूल देणाऱ्या कोकीळेचं रहस्यमय आयुष्य जाणून घ्या

Cuckoo Bird Facts : कोकीळेचा मधुर कुहू आवाज वसंताची चाहूल देतो; मात्र तिचे रूप, जीवनशैली, विणीचा हंगाम आणि कावळ्याशी असलेले अनोखे नाते अनेकांना आजही फारसे माहिती नाही.
Asian Koel Bird

Asian Koel Bird

esakal

Updated on

शेखर ओढेकर

कोकीळ आणि कोकिळा दिसण्यात जरा भिन्नच. कोकीळ साधारण कावळ्याच्या आकाराचा, गडद निळसर-काळ्या रंगाचा आणि डोळे लालबुंद आणि मण्यासारखे. प्रथमदर्शी तो कावळा वाटावा इतका तो कावळ्यासारखा दिसतो. त्याउलट कोकिळा. तिचा रंग साधारण करडा व त्यावर खवल्यांसारखे पांढरे ठिपके, शेपटीवर पांढऱ्या पट्ट्या, डोळे लाल, आकाराने कोकीळपेक्षा थोडी लहान.

वैशाखाच्या उन्हात निसर्ग पोळून निघतो. पण याच वैशाखात सकाळी आणि संध्याकाळी कोकीळ पक्ष्याचा कुहूऽऽऽ कुहूऽऽऽ स्वर आसमंत व्यापून टाकतो. ही वसंत ऋतूच्या आगमनाची वार्ता असते. वसंत ऋतूमधील वातावरण बदलातील कोकीळ कूजन हा महत्त्वाचा भाग आहे. या ऋतुराजाचे अस्तित्व कोकीळ कूजनामुळे अधिकच खुलते. आपणासाठी तो एक प्रकारचा गजरच असतो, असे वाटते. ती कुहुकुहू खूपच मधुर आणि मंजूळ वाटते. कोकीळ पक्ष्याचा गोड स्वर वातावरण नादमय करून सोडतो. अशा या पक्ष्याबद्दल कायमच उत्सुकता वाटली आहे. नेमका कसा आहे हा पक्षी, हा विचार मनात नेहमी येतो.

खरेतर कोकीळ पक्षी जवळपास कावळ्यासारखाच. कावळ्यात आणि कोकीळ पक्ष्यात आकार, रंग, शरीररचनेबाबत एकंदर खूपच साम्य. पण आवाजाच्या बाबतीत अगदीच जमीन-आस्मानाचा फरक! साधारणपणे एप्रिल ते ऑगस्टपर्यंत त्यांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे ते या काळात दिसतात आणि त्यांची कुहुकुहूही याच काळात ऐकायला मिळते. इतरवेळी हे शांत असतात, कुहुकुहूही बंद असते. त्यामुळे त्यांचे अस्तित्वच जाणवत नाही. कोकीळ मुख्यतः दाट पानांची झाडे, बगीचे, उंच वृक्ष या ठिकाणी आढळतात. बरेचदा दाट पाने आणि उंच वृक्षांमुळे ते आपल्याला दिसत नाहीत, पण त्यांच्या आवाजाचे मधुर संगीत मात्र मन मोहून घेते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com