डॉ. नसली आर. इचापोरिया
पुण्यासह राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये सध्या गुलियन बॅरी सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. हा आजार ऑटोइम्यून डिसीझ प्रकारातील आहे. याच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑटोइम्यून डिसिजेस चर्चेत आले आहेत. पण, हे ऑटोइम्यून डिसिजेस नक्की काय असतात? त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार यावर टाकलेला प्रकाश...