गीत रामायणातील ‘अयोध्या मनुनिर्मित नगरी’ हे गाणं ऐकल्यापासूनच प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानाला भेट द्यायची ओढ अखेर चाळीस वर्षांनी पूर्ण

महाराष्ट्राचे प्रख्यात कवी व गीतकार ग.दि. माडगूळकर लिखित व ‘बाबुजी’ सुधीर फडके यांनी गायलेले गीत रामायणातील गीत ‘अयोध्या मनुनिर्मित नगरी’ हे गाणं ऐकल्यापासूनच आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानाला भेट द्यायची ओढ लागली
ayodhya ram mandir
ayodhya ram mandiresakal
Updated on

चंद्रशेखर दांडेकर

मी जवळजवळ १२ देशांमध्ये फिरून आलो आहे, पण भारतात फिरल्यावर ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा’ असं वाटत राहतं. महाराष्ट्राचे प्रख्यात कवी व गीतकार ग.दि. माडगूळकर लिखित व ‘बाबुजी’ सुधीर फडके यांनी गायलेले गीत रामायणातील गीत ‘अयोध्या मनुनिर्मित नगरी’ हे गाणं ऐकल्यापासूनच आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या  जन्मस्थानाला भेट द्यायची ओढ लागली होती. साधारण ४० वर्षांपूर्वी आम्ही नेपाळ यात्रेवरून परतताना अयोध्येला भेट दिलीही होती. त्याकाळी रामलल्ला लोखंडी गजांआड बंदिस्त होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com